34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरसोमवारी होम मैदानावर होणार पंतप्रधान मोदींची सभा

सोमवारी होम मैदानावर होणार पंतप्रधान मोदींची सभा

सोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित झालेल्या होम मैदानावर सहा वर्षांपासून एकही मोठा कार्यक्रम झाला नाही. २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी मैदानावर कामे सुरु असल्याने मैदान कोणीच मागितले नाही. २०१६ मध्ये महापालिकेने ठराव करीत हे मैदान व्हीव्हीआयपींच्या सभेसाठी किंवा मोठ्या राज्यस्तरीय प्रदर्शन, कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने याचाच आधार घेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या होम मैदानाची सर्वप्रथम मागणी केली. पण, परवानगी देण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना २०१० पासूनचे रेकॉर्ड तपासावे लागले.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच महापालिकेने नेत्यांच्या मोठ्या प्रचारसभांसाठी कोणकोणती मैदाने भाड्याने देता येतील, याची यादी तयार केली. त्यात जुनी मिल कंपाऊंडजवळील एक्झिबिशन ग्राउंड, पुंजाल मैदान, कर्णिक नगर, सावरकर मैदान, हुडको क्र. तीन क्रीडांगण, दाजी पेठ क्रीडांगण, संभाजी तलावालगतचे मैदान, परिवहन बस डेपो परिसर, जय भवानी प्रशालेचे मैदान व अल्ली महाराज मैदानाचा समावेश होता. त्यात होम मैदानाचे नाव नव्हते. तरीपण, भाजपच्या प्रचारसभेसाठी महापालिकेने त्यांना स्मार्ट सिटीतून विकसित झालेले मैदान दिलेच कसे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. हे मैदान भाजपला देण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे होम मैदानाची मागणी केली. त्यावेळी पेचात पडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी २०१० पासूनचे दोन पोत्यातील जुने रेकॉर्ड सलग पाच दिवस रात्रंदिवस पडताळले. त्यावेळी २०१५-१६ मध्ये हे मैदान कृषी प्रदर्शनासाठी दिल्याचा कागद सापडला. त्यानंतर २०१६ मध्ये महापालिकेने केलेल्या ठरावानुसार व्हीव्हीआयपी नेत्यांच्या सभांना व मोठ्या प्रदर्शनासाठी होम मैदान भाड्याने देण्याचा अधिकार महापालिकेने स्वत:कडे राखून ठेवल्याची माहिती देखील समोर आली. त्याचा आधार घेत महापालिकेने भाजपला हे मैदान सभेसाठी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR