29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडमुखेडला अवकाळीचा तडाखा; वीज पडून चार जनावरे दगावली

मुखेडला अवकाळीचा तडाखा; वीज पडून चार जनावरे दगावली

मुखेड : प्रतिनिधी
मुखेड तालुक्यात दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिला. यावेळी वीज पडून तालुक्यात चार जनावरे दगावली. तर फळबागांसह आब्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले असून वादळी वा-यासाह अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. मुखेड तालुक्यात दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिला. यावेळी वीज पडून तालुक्यात चार जनावरे दगावली.

यात ताईबाई तांडा येथे लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या शेळ्यावर विज पडल्याने २ शेळ्या दगावल्या आहेत तसेच मौजे चांडोळा येथील मधुकर भारत पाटील यांची १ म्हैस तर मौजे आखरगा येथे माधव गणपती गंगनर यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसात वीज पडून नुकसान झालेल्या तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळांचा तलाठयांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन अहवाल तहसिल कार्यालयात दाखल केला अशी माहिती तहसिल कार्यालय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांसह फळबाग व आब्यांचे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR