28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे १२ कोटी ८८ लाख मंजूर

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे १२ कोटी ८८ लाख मंजूर

मुंबई : परदेशात उच्च शिक्षण घेणा-या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १२ कोटी ८८ लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४ मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यातील या वर्षातील बॅचमधील ३२ तर मागील बॅचमधील २ विद्यार्थांना १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR