30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यप्रदुषणामुळे १८ सिगारेट्सचा धूर शरीरात

प्रदुषणामुळे १८ सिगारेट्सचा धूर शरीरात

- वाढते प्रदूषण हानीकारक - दिल्ली-मुंबईत गाठला उच्चांक

नवी दिल्ली/मुंबई : जगभरात प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यातल्या त्यात भारतातील प्रदूषणाची पातळी ही प्रचंड वाढत आहे, हे टाळण्यासाठी केंद्र सरकार देखील विविध उपाय करत आहे. दिल्ली आणि मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठला आहे, याचा परिणाम माणसांच्या आोग्यावर होतो. तुम्ही जरी सिगारेट पीत नसाल तरी प्रदूषणावाटे जवळपास १८ सिगारेटचा धूर तुमच्या शरीरात जातो.

जर आपण २९ ऑक्टोबर, म्हणजेच रविवारबद्दल बोललो तर, ग्रेटर नोएडामधील हवेचा दर्जा निर्देशांक ३६५ आहे. बर्कले अर्थ सायंटिफिक पेपरच्या अहवालात असे म्हटले आहे की, एक सिगारेट प्रति घनमीटर २२ मायक्रोग्राम प्रदूषण पसरवते. तुम्हाला अधिक सोप्या भाषेत समजावून सांगायचे झाले तर, तुम्ही या हवेतून दररोज १७ ते १८ सिगारेटचा धूर श्वासावाटे शरिरात घेता. दिल्लीत प्रदूषणामुळे वाईट परिस्थिती आहे. दिल्लीसह मुंबईचा एक्यूआयदेखील वाढला आहे, हे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या आजूबाजूची हवा किती अशुद्ध आहे. जर एक्यूआय ५०० पेक्षा जास्त वाढला, तर अशा ठिकाणचे लोक दिवसाला एक पाकिट सिगारेटइतका धूर श्वासावाटे शरिरात घेतात. तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत फक्त ऑक्सिजनच नाही, तर सिगारेटचा धूरही असतो.

विषारी हवेमुळे आयुष्य होतेय कमी
दिल्लीची हवा इतकी विषारी आहे की, त्यामुळे नागरिकांचे सरासरी आयुर्मान जवळपास १७ वर्षांनी कमी झाले आहे, असे एका संशोधनातून समोर आले. आणखी एक भयावह वस्तुस्थिती म्हणजे, देशातील वायू प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंची संख्या. विषारी हवेमुळे मृत्यूचे प्रमाण प्रति १ लाख लोकांमागे १३४ होते, जे जागतिक सरासरीच्या जवळपास ६४ टक्के दुप्पट आहे.

प्रदूषण सर्वांसाठीच धोकादायक
एचआयव्ही आणि मलेरियासारख्या प्राणघातक आजारांपेक्षा प्रदूषण अधिक घातक बनले आहे. प्रदूषणाचा मानवाव्यतिरिक्त पक्षी आणि समुद्री जीवांवरही परिणाम होतो. दरवर्षी प्रदूषणामुळे हजारो जीवांचाही मृत्यू होतो. दरवर्षी प्रदूषण आणि त्यामुळे होणा-या नुकसानाबाबत विविध प्रकारचे अहवाल येत राहतात, मात्र त्यातील मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी ते झपाट्याने वाढत आहेत. भारत हे जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर आहे. तर दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये अग्रस्थानी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR