28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात कृष्णवर्णीय कारचालकाचा मृत्यू

अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात कृष्णवर्णीय कारचालकाचा मृत्यू

वॉशिंग्टन : गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नाही म्हणून अमेरिकेतील शिकागो पोलिसांनी एका कृष्णवर्णीय कार चालकाला गोळया घालून ठार केले आहे.पोलिसांनी अवघ्या ४१ सेकंदात कारवर ९६ गोळ्या झाडल्या. यात कारचा चालक डेक्सटर रीड याचा मुत्यू झाला. ही घटना २१ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यासंबंधीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिका-याच्या गणवेशावर बसवण्यात आलेल्या बॉडी कॅममध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये ५ पोलीस अधिकारी एका पांढ-या कारवर गोळीबार करताना दिसत आहेत.

पोलिसांचे म्हणणे आहे रीडने गाडी चालवत असताना सीटबेल्ट लावला नव्हता, यामुळे त्याच्या कारला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रथम गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरात पोलिस अधिका-यांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, व्हिडिओमध्ये रीड गोळीबार करताना दिसत नाही. पण त्याच्या कारमधून बंदूक जप्त करण्यात आली आहे. २६ वर्षीय डेक्सटर रीडची कार थांबवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीची काच उघडली आणि नंतर बंद केली. पोलिसांनी त्याला अनेक वेळा बाहेर येण्यास सांगितले. मात्र रीड बाहेर आला नाही तेव्हा पोलिस अधिका-यांनी आपली बंदुक बाहेर काढली.आणि गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर रीड कारमधून बाहेर जमिनीवर पडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.पोलिसांच्या मते, रीडने ४० गोळ्या पोलिसांवर झाडल्या होत्या.

 

वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे यापूर्वीही केला पोलिसांनी गोळीबार

दरम्यान, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे मे २०१७ मध्ये, सेड्रिक मिफ्लिन या २७ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्तीच्या चालत्या कारवर पोलीस अधिकारी मायकल सिव्हर्सने १६ गोळ्या झाडल्या. होत्या, त्यात त्याचा मुत्यू झाला होता. यानंतर ११ एप्रिल २०२१ रोजी डोन्टे राइटला गोळ्या घालण्यात आल्या. तर २७ जून २०२३ रोजी, अमेरिकेच्या ओहायोमधील अक्रोन शहरात पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर गोळीबार केला, परिणामी त्याचा मृत्यू झाला. जयलँड वॉकर असे मृताचे नाव होते. त्यानेही वाहतुकीचे नियम पाळत नव्हते. पोलिसांनी अडवल्यानंतरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.दरम्यान कृष्णवर्णीय लोकांवर गोळीबार केल्यानंतर अमेरिकन पोलिसांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागते. अमेरिकेमधील वर्णभेदाचा इतिहास २५० ते ३०० वर्षे जुना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR