32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयशाळेत आली ‘एआय’ शिक्षिका; केरळमधील शाळेचा खास उपक्रम

शाळेत आली ‘एआय’ शिक्षिका; केरळमधील शाळेचा खास उपक्रम

नवी दिल्ली : भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल टाकण्यात आले आहे. त्याची सुरुवात केरळमधील एका शाळेतून झाली. या शाळेने ‘एआय’ तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त केली आहे. या शिक्षिकेचे नाव आयरिस असे असून मेकरलॅब्ज एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने विकसित केले आहे. आयरिस केरळमधील आणि संपूर्ण देशातील पहिलेच ुमनाईज्ड रोबोट आहे.

केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने हे संशोधन केले आहे. कडुवाईल थंगल चॅरिटेबल ट्रस्टने यासाठी प्रयत्न केले. आयरिस अटल टिकरिंग लॅब (एटीएल) प्रोजेक्टचा भाग आहे. २०२१ मध्ये नीती आयोगाने याची घोषणा केली होती. शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटिजला प्रोत्साहन देण्यासाठी हे डिझाईन करण्यात आले होते.

मेकरलॅब्ज कंपनीद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत या बहुभाषिक ‘एआय‘ शिक्षिकेच्या क्षमता तपासल्या जाऊ शकतात. आयरिस विविध विषयांवरील अवघड प्रश्नांची उत्तर देऊ शकते. तसेच पर्सनल व्हॉईस असिस्टंट देखील देऊ शकते.

ही शिक्षिका इंटरअ‍ॅक्टिवली शिक्षणाचा अनुभव सुविधाजनक करु शकते. भारत सरकारचा प्रोजेक्ट एटीएलचा हा एक भाग आहे. ज्याचा उद्देश शाळांमध्ये मुलांचा अ‍ॅक्टिव्हिटिजमध्ये सहभाग वाढावा हा आहे. आयरिस तीन भाषेत बोलू शकते तसेच अवघड प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR