36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीअज्ञात व्यक्तीने ढालेगाव शिवारातील ऊस जाळला

अज्ञात व्यक्तीने ढालेगाव शिवारातील ऊस जाळला

पाथरी : पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी उत्तम शंकरराव शिंदे रा. ढालेगाव यांची मौजे ढालेगाव शिवारात गट क्र. १८ मध्ये शेतजमीन असून सदर शेतजमीनीतील ० ते २० आर एवढ्या क्षेत्रात त्यांनी गेल्या वर्षी ऊस लागवड केली होती.

त्याची तोड चालु असताना दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ऊसाला आग लावून पूर्णपणे जाळुन टाकला असल्याचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. जळालेल्या ऊसाचा पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावामध्ये खुप मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आलेली असल्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्वरीत आळा घालण्यात यावा अशी मागणी शेतकरी उत्तम शिंदे पाटील ढालेगावकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR