28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरमोहोळ शहरात कारमधून हजार लिटर हातभट्टी दारु जप्त,भरारी पथकाची कारवाई

मोहोळ शहरात कारमधून हजार लिटर हातभट्टी दारु जप्त,भरारी पथकाची कारवाई

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारास मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर-पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारुसह सवा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.  सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 26 फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर-पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनिल बाबुराव चव्हाण, वय 36 वर्षे रा. गणपत तांडा, बक्षीहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुझुकी एर्टीगा क्र. टऌ13 ऊ 2548 या चारचाकी वाहनातून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटर हातभट्टी दारु वाहतूक करतांना आढळून आला.

आरोपीच्या ताब्यातून पंचवीस हजार पाचशे किंमतीची हातभट्टी दारु व नऊ लाखाची कार असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे, दुय्यम निरिक्षक शिवकुमार कांबळे, जवान अण्णा कर्चे, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR