35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगएचडीएफसी बॅँकेला मान्यता; ६ बॅँकेतील भाग भांडवल खरेदी करणार

एचडीएफसी बॅँकेला मान्यता; ६ बॅँकेतील भाग भांडवल खरेदी करणार

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक ‘एचडीएफसी’ने आज सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून संपादनाला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर, एचडीएफसी बँक आता आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेसह ६ बँकांमधील प्रत्येकी ९.५ टक्के भागभांडवल खरेदी करू शकते.

रिझर्व्ह बँकेने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली. एचडीएफसी बँक ग्रुपमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने दिलेली ही मान्यता एका वर्षासाठी वैध आहे आणि जर एचडीएफसी बँक त्या कालावधीत शेअरहोल्डिंग मिळवण्यात अपयशी ठरली तर ही मान्यता रद्द केली जाईल.

येस बँक, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक, आयसीआयसीआय बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रस्तावाला ‘आरबीआय’ने मंजुरी दिली आहे.

ग्राहकांवर परिणाम होणार नाही…
लोकांच्या मनात प्रश्न आहे की, या संपादनाचा त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होईल का? या अधिग्रहणाचा इंडसइंड बँक, येस बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँका, बँकिंग सेवा आणि ग्राहकांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.

एचडीएफसी बँक समूहाला ‘आरबीआय’ने आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेसह ६ बँकांमधील ९.५ टक्के भागभांडवल विकत घेण्यास मान्यता दिली आहे. या वृत्तामुळे अनेक दिवसांपासून घसरणीसह व्यवहार करणा-या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज किंचित वाढ दिसून आली. आज दुपारी १.४५ पर्यंत या शेअरने १४४७ रुपयांचा उच्चांक गाठला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR