28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसकडून दिल्लीतील ३ उमेदवारांची घोषणा; कन्हैया कुमार दिल्लीतून लढणार

काँग्रेसकडून दिल्लीतील ३ उमेदवारांची घोषणा; कन्हैया कुमार दिल्लीतून लढणार

नवी दिल्ली : विद्यार्थी संघटनेतून राजकारणात पाऊल ठेवलेल्या तसेच आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांच्या धोरणांची चिरफाड करणा-या कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. राजधानी दिल्लीतील उत्तर पूर्वमधून कन्हैया कुमारला काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कन्हैयाची लढत भाजप नेते तथा विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी होईल.

देशाची राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीत एकत्रित निवडणूक लढविणारे काँग्रेस पक्ष ३ तर आम आदमी पक्ष ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. रविवारी रात्री काँग्रेस पक्षाने दिल्लीतील ३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल, उत्तर पश्चिममधून उदित राज तर उत्तर पूर्वमधून कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार सीपीआयकडून बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढला होता. त्या निवडणुकीत कन्हैयाचा सुमारे ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. निवडणुकीनंतर कन्हैयाने काँग्रेस पक्षात प्रवेश करून राहुल गांधी यांच्यासोबतीने भारत भ्रमंती केली. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत कन्हैयाचा महत्त्वाचा सहभाग होता. यात्रेच्या रणनीतीपासून सभांच्या आखणीचे काम कन्हैयाने सांभाळले. गेल्या दोन-अडीच वर्षात कन्हैयाने काँग्रेसचा विचार आपल्या भाषणांतून देशभरात संधी मिळेल तिथे मांडला. याचेच फळ आजच्या उमेदवारीतून काँग्रेसने कन्हैयाने दिल्याचे बोलले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR