35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयनैनितालमधील जंगलाला आग; निवासी भागाला धोका

नैनितालमधील जंगलाला आग; निवासी भागाला धोका

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जंगलात शुक्रवारी लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले आहे. या आगीचे लोट आता नैनितालच्या हायकोर्ट कॉलनीत पोहोचले आहेत. जंगलाला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी नैनिताल प्रशासनाने वन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि लष्कराच्या कर्मचा-यांना पाचारण केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. या आगीमुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, शेजारी राहणा-या लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे ही आग पाइन्स परिसराजवळील संवेदनशील लष्करी तळांपर्यंत पोहोचण्याची भीती आहे. जंगलाला लागलेल्या आगीमुळे नैनीताल जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नैनी तलावात बोटिंगवर बंदी घातली आहे. आग विझवण्यासाठी नैनिताल प्रशासनाने ४२ जवान तैनात केले आहेत.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली असून, प्रशासनाला सर्तकतेचे आदेश दिले आहेत. आग विझविण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असत आहेत. दरम्यान, नैनितालच्या जळत्या जंगलांचा विध्वंस रोखण्यासाठी हवाई दल देखील घटनास्थळी दाखल झाले असून, हेलिकॉप्टरमधून पाण्याचा छिडकाव करण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात आगीच्या अनेक घटना घडल्या
दरम्यान, उत्तराखंडच्या वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यातील कुमाऊं भागात जंगलाला आग लागण्याच्या २६ आणि गढवाल प्रदेशात पाच घटना घडल्या आहेत. आगीमुळे आतापर्यंत ३३.३४ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत उत्तराखंडच्या अधिका-यांनी जाखोली आणि रुद्रप्रयागमधील जंगलात आग लावल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. जंगलातील आग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR