31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रनवले पुलावरील आंदोलनप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल

नवले पुलावरील आंदोलनप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ करत सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. मंगळवारी पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरही आंदोलकांनी टायर जाळत रास्ता रोको केला. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा खेड-शिवापूरपर्यंत लागल्या होत्या. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

नवले पुलावर जाळपोळ केल्याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बंगळुरू बा वळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR