34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतृतीयपंथी समुदायासाठी उघडली पहिली मशीद

तृतीयपंथी समुदायासाठी उघडली पहिली मशीद

ढाका : रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये बांगलादेशातील ढाका येथे तृतीयपंथी समुदायासाठी एक मशीद उघडण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर मयमनसिंगजवळ सरकारी दान केलेल्या जमिनीवर तृतीयपंथी समुदायासाठी मशीदीची स्थापना करण्यात आली आहे.

बांगलादेशातील तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांनी नवीन मशीद बांधण्याच्या आणि परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तृतीयपंथी समुदायाच्या नेत्या जोयिता टोनू यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, यापुढे कोणीही तृतीयपंथी व्यक्तीला आमच्या मशिदीत प्रार्थना करण्यास नाकारू शकत नाही.

ही मशीद सरकारने दान केलेल्या जमिनीवर उभारण्यात आली आहे. मशिदीच्या चारही बाजुला भिंत बांधण्यात आली आहे. तर वरती पर्त्याचे छत केले आहे.

४२ वर्षीय सोनिया म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्यात पुन्हा मशिदीत नमाज पढू शकेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. सोनियाने सांगितले की, त्यांना लहानपणापासून कुराण वाचनाची आवड होती आणि ती इस्लामिक मदरशात शिकत असे.

नमाज पढण्यास होती बंदी
सोनियाने सांगितले की, जेव्हा लोकांना ती ट्रान्सजेंडर असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिला मशिदीत नमाज पढण्यापासून रोखण्यात आले. सोनियाने एएफपीला सांगितले की लोक तिला सांगत असत की ती तृतीयपंथी आहे, त्यामुळे ती मशिदीत येऊ शकत नाही. तृतीयपंथी केवळ घरीच प्रार्थना करू शकतात आणि त्यांनी मशिदींमध्ये येऊ नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR