34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपक्ष सोडून जाऊ नका

पक्ष सोडून जाऊ नका

पुणे : पुणे लोकसभेसाठी इच्छूक असतानाही उमेदवारी न मिळाल्याने पुण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा बागूल नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी अतिशय आक्रमकपणे आणि जाहीररित्या व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने तरीही लक्ष न दिल्याने बागूल थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुण्यात आले असताना त्यांनी आबा बागूल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

बाळासाहेब थोरात यांनी आबा बागूलांची मनधरणी केल्याचे समजते. यावेळी थोरात यांच्यासोबत माजी राज्यमंत्री रमेश बागवे तसेच ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार देखील होते. काँग्रेस सोडून जाऊ नये, अशी विनंती थोरात यांनी बागूलांना केली आहे. थोरात यांनी बागूलांना विनंती केली की, पक्ष सोडून जाऊ नका, प्रचारात सक्रिय व्हा, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. दरम्यान थोरात-बागूल भेटीत बागूल यांनी आपल्या तक्रारी मांडल्या आणि काही मागण्या देखील पक्षाकडे केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR