27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeपरभणीडॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी राजकुमार भांबरे

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी राजकुमार भांबरे

परभणी : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून परभणी येथील करसल्लागार राजकुमार भांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवास्थान रामेश्वरम येथील हाऊस ऑफ कलाम कार्यालयातून फॉऊंडेशनचे चेअरपर्सन डॉ.एपीजेएम नजीमा मरायीकर यांनी या संदर्भातील नियुक्तीपत्र भांबरे यांना पाठविले आहे. ही नियुक्ती राष्ट्र उभारणीसाठी, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या दृष्टिकोन आणि मूल्यांशी सुसंगत राहण्याच्या, समतोल निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

राज्य समन्वयक म्हणून भांबरे यांना महाराष्ट्रातील सर्व फाउंडेशन उपक्रमांचे समन्वय आणि देखरेख करावी लागणार आहे. फाऊंडेशनच्या मान्यतेने जिल्हा, तालुका आणि प्रादेशिक समन्वयकांची नियुक्ती आणि मार्गदर्शन करणे. युवा विकास, नवोन्मेष आणि सामाजिक परिणामांशी संबंधित फाउंडेशन कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग भागीदार आणि नागरी समाज यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. भांबरे यांच्या नियुक्तीचे स्वरूप वरिष्ठ मानद असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

या नियुक्तीबद्दल करसल्लागार राजकुमार भांबरे यांचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी, केएनपी इन्स्टिट्युटचे मेघशाम पत्की, प्राचार्य प्रिया ठाकूर, ज्ञानोबा शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, नगरसेवक डॉ. केदार खटींग, अ‍ॅड. दिपकराव देशमुख, रामेश्वर शिंदे, प्रा. तुकाराम सुर्यवंशी, कल्याण दळवी, पुरभाजी जावळे, नामदेव चव्हाण, माणिकराव शिंदे, उमाकांत भरोसे, सुशिल देशमुख, मुख्याध्यापक राजु शिंदे, महेश सोनी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR