30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रपाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

करपा रोगाचाही प्रादुर्भाव

नाशिक : प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतक-यांनी टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे. मात्र यंदा पाण्याची कमतरता जाणवत असून टरबूज व खरबुजाचे पीक धोक्यात आले आहे. परिणामी त्यांच्या उत्पादनावर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

नाशिकच्या कसमा पट्ट्यात रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेत अनेक शेतकरी टरबूज, खरबुजाची लागवड करतात. मात्र बदललेले वातावरण, विहिरीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे मुबलक पाणी न मिळाल्याने टरबूज व खरबुजाचे वेल सुकून गेले आहेत. तर बदलत्या वातावरणाचा फटका खरबुजाला बसल्याने त्यावर करपा रोग व डावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पिकाचे वेल सुकल्याने फळे उघडी पडू लागल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.

शेतक-याचे आर्थिक नुकसान
पाण्याची कमतरता जाणवत असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचण निर्माण होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शेतक-यांना ऐन हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादनात घाटा येत असल्याने शेतक-याला आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR