38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरशेतकरी दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत

शेतकरी दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत

सोलापूर : ऑक्टोबरनंतर जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश झाला. राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दोन हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजार रुपयांची मदत मंजूर केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील पाच लाख १९ हजार ८४९ शेतकरी आहेत.

आतापर्यंत केवळ ६० हजार शेतकऱ्यांच्याच याद्या तालुकास्तरावरून अपलोड झाल्या असल्याने शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागेल, अशी वस्तुस्थिती आहे.
पावसाळ्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी, खरीप पिकांचे नुकसान झाले. आता जमिनीतील पाणीपातळी खालावली असून पाण्याअभावी शेत ओस पडले आहे. बँकेसह खासगी सावकारांच्या कर्जाचा डोंगर, मुलांचे शिक्षण, मुलीचा ववाह आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह, परासाठी बळिराजाला कसरत करावी लागत आहे.

शासनाने दुष्काळी तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. सध्या तलाठ्यांकडून
बाधीतांसाठी गावनिहाय याद्या तहसीलदार स्तरावर अपेक्षित असून त्याठिकाणी ऑनलाइन अपलोड झालेल्या याद्या जिल्हास्तरावर येतात. मंजुरी मिळाल्यानंतर भरपाईस पात्र शेतकऱ्यांना एक क्रमांक मिळतो आणि त्यावर ई-केवायसी केल्यावर त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे. मात्र, १ ते २० मार्च या काळात फक्त ६० हजार बाधित शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड झाल्या आहेत. अद्याप साडेचार लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड व्हायच्या राहिल्या आहेत.

तहसीलदारांकडून अपलोड झालेल्या याद्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी दिल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना जो क्रमांक येईल, त्यावरून त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करायची आहे. त्याशिवाय त्यांना मदतीची रक्कम मिळणार नाही. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर झालेल्या दुष्काळी मदतीसाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळी पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या मार्चअखेर अपलोड होतील, यादृष्टीनेजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल असे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे.असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR