40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्रोला मिळाला ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स’ पुरस्कार

इस्रोला मिळाला ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स’ पुरस्कार

नवी दिल्ली : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.

अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्त्रोला देण्यात आला. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला, असे अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटले होते.

यात पुढे म्हटले आहे, अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केले. तसेच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरेच मोठी कामगिरी आहे. इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR