30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडलोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी : पटोले

लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी : पटोले

श्रीक्षेत्र माहूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, कधी जे झाले नाही ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आम्हाला वाचवा असे म्हणाले. केंद्राने न्यायाधीशांच्या नेमणूका आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. संविधानिक व्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने लोकांनी निवडणुका हातात घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भातील पाचही जागेवर भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. देशात या निवडणुकीत परिवर्तनाची नांदी असल्याचे मत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज माहूर गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरद्वारे आले होते. यावेळी त्यांनी माहूर गडावर जाऊन दर्शन घेतले व आरती केली. यावेळी श्री रेणुका देवी संस्थानकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी विधान परिषद सदस्य वझाहात मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाना पटोले म्हणाले की, हुकुमशाही पद्धतीने वागणा-या भाजपाविरोधात व मोदीविरोधात जनतेत चीड असल्याने अमरावतीच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी यांची हवा राहिली नाही, असे वक्तव्य केले आहे.त्या मुळे देशात परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी विधान परिषद सदस्य वझाहात मिर्झा डॉ निरंजन केशवे शिवरकर किसन राठोड आनंद तूप डाळे सय्यद अजीम यांचे सह मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR