30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरही लोकसभा शेवटची; चंद्रकांत खैरे यांनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा

ही लोकसभा शेवटची; चंद्रकांत खैरे यांनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा

छ. संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीनगरचे माजी खासदार आणि मविआचे विद्यमान उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज त्यांच्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंना तिकिट दिले जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अंबादास दानवे यांनीच तशी इच्छाही बोलून दाखवली होती. मात्र कुणालाही तिकिट दिले तरीही आम्ही त्या उमेदवारासाठी प्रचार करु असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर अंबादास दानवे काहीसे नाराजही झाले होते. पण त्यानंतर त्यांनी जोमाने प्रचार सुरु केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत खैरेंनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली आहे. भाजपाने सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. सगळे काही देऊनही एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. या सगळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. लोकसभेची निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे. शिवसैनिकांना, जुन्या मतदारांना धनुष्यबाणाला मत द्यायची सवय आहे त्या सगळ्यांपर्यंत आपल्या पक्षाचं मशाल हे चिन्ह पोहचवा असे आवाहन चंद्रकांत खैरेंनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR