40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाआंद्रे रसेलने रचला इतिहास

आंद्रे रसेलने रचला इतिहास

आयपीएलमध्ये २ हजार धावा आणि १०० बळी घेणारा ठरला दुसरा खेळाडू

नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शुक्रवारी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इतिहास रचला. आयपीएलमध्ये २००० हून अधिक धावा करणारा आणि १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रसेल हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. रसेलने २०१२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. तर २०१४ मध्ये तो केकेआरमध्ये सामील झाला आणि त्याने ११४ सामन्यांमध्ये २,३२६ धावा काढून १०० विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये दोनदा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार पटकावणा-या रसेलने शुक्रवारी आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात २९ धावांत दोन बळी घेतले. यासह त्याने आयपीएलमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या. केकेआरने २०२२ च्या मेगा लिलावात रसेलला कायम ठेवले होते. रसेलने आरसीबीविरुद्ध कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदारला बाद केले. विराट कोहलीसह ग्रीन आरसीबीसाठी वेगवान धावा काढत होता, तेव्हा रसेलने त्याला टिपले. या कालावधीत, आयपीएलमध्ये १००० धावा करणारा आणि १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रसेल जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे आहे. या यादीत जडेजा आघाडीवर आहे, त्याने २२८ सामन्यांमध्ये २,७२४ धावा आणि १५२ विकेट घेतल्या आहेत. तर जडेजा आणि रसेल हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये २००० हून अधिक धावा आणि १०० हून अधिक बळी घेतले आहेत.

आयपीएलमध्ये १००० धावा आणि १०० बळी घेतलेले खेळाडू

खेळाडू मॅच रन विकेट

रवींद्र जडेजा २२८ २७२४ २५२
सुनील नारायण १६४ १०९५ २६५
ड्वेन ब्राव्हो १६१ १५६० १८३
अक्षर पटेल १३८ १४५४ ११३
आंद्रे रसेल ११४ २३२६ १००

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR