36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयहोळीला भारताकडून चीनला झटका, १० हजार कोटींचा फटका

होळीला भारताकडून चीनला झटका, १० हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : यंदा होळीचा उत्सव देशभरात जोरदार साजरा केला गेला. या उत्सवात यंदा विक्रीचे सर्व विक्रम मोडले गेले. परंतु त्याचवेळी चीनला झटकाही भारताकडून दिला गेला. यंदा देशात होळीच्या सामानांची विक्री ५०% वाढली आहे. परंतु चीनला १० हजार कोटींचा फटका बसला आहे.

देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. व्यापारी संघटना कॅटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय ५० हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. दिल्लीत पाच हजार कोटींच्या सामानांची विक्री झाली आहे. परंतु चीनी साहित्यांचा वापर कमी झाला. यामुळे चीनला १० हजार कोटींचे नुकसान झाले.

होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल चीनमधून आयात केला जात होता. त्याचा फायदा चीनला होत होता. परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहेत. स्वदेशीला मागणी वाढली. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ला पाठिंबा दिला. त्याचा फायदा देशातील व्यापा-यांना झाला आहे. तसेच चीनचे १० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यंदा होळीनिमित्त झालेल्या या बदलामुळे चीनला चांगल्या मिरच्या झोंबल्या आहेत.

भारतीय व्यापारी आधी चीनमधून सामान मागवत होते. परंतु चीनने भारताविरोधी भूमिका घेतली. सातत्याने चीनचे हे उद्योग थांबले नाही. यामुळे भारतीय लोकांनी चीनवर बहिष्कार अस्त्राचा वापर सुरु केला. यामुळे होळीला यावर्षी देशात चीनी साहित्य देशातील बाजारपेठांमध्ये दिसले नाही. लोकांनी देशात निर्मिती झालेल्या वस्तूंची खरेदी केली.

यंदा होळीला सर्वाधिक विक्री रंग, गुलाल, पिचकारी, फुगे, चंदन, पूजा सामग्रीची विक्री झाली. तसेच लोकांनी देशातच तयार करण्यात आलेल्या हर्बल रंगाना प्राधान्य दिले. ड्राय फ्रूटस, गिप्ट आयटम्स, कपडे, किराणा, खाण्यापिण्याचा वस्तू यांचा वापर यंदा जास्त झाला. होळीत झालेल्या या बदलाचा जोरदार फटका चीनला बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR