24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeराष्ट्रीयसर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये भारत सातवा

सर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये भारत सातवा

भारतीय दर आठवड्याला सरासरी ४७.७ तास काम करतात

नई दिल्ली : सुप्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, भारतीय तरुणांनी दर आठवड्याला किमान ७० तास काम करावे, जेणेकरून उत्पादकता वाढू शकेल आणि कामात होणारा विलंब टाळता येईल. यानंतर देशातील व्यावसायिक जगतात वेगवेगळे मतप्रवाह उमटत असून काही जण या सूचनेला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण याला ‘नॉन-प्रॅक्टिकल’ असेही म्हणत आहेत.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननुसार, (आयएलओ) या वर्षीच्या एप्रिलपर्यंत दर आठवड्याला सर्वात जास्त काम करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. भारतात दर आठवड्याला सरासरी ४७.७ तास काम केले जाते, पण किती टक्के भारतीय ४९ तास किंवा त्याहून अधिक काम करतात याची आकडेवारीही आयएलओकडे नाही.

विशेष म्हणजे, भारतात सरकारी कार्यालये आठवड्यातून पाच दिवस काम करतात आणि दररोज फक्त ७.५ ते ८ तास काम करण्याचा नियम आहे. गरजेनुसार काही कर्मचारी आणि अधिकारी यापेक्षा जास्त वेळ काम करतात. दुसरीकडे, खासगी संस्थांमध्येही पाच दिवस आणि सहा दिवसांचा आठवडा असा नियम असला तरी दररोज सरासरी ८ किंवा ९ तास काम करावे लागते. काही कंपन्यांमध्ये यापेक्षाही जास्त काम करावे लागते.

जगातील सर्वात जास्त तास काम करणारा देश म्हणजे ५२.६ तास संयुक्त अरब अमिराती (युएई) आहे. जिथे ४६ टक्के कर्मचारी दर आठवड्याला ४९ तास किंवा त्याहून अधिक काम करतात. तर दुसऱ्या क्रमांकावर गॅम्बिया आहे. तिथे २६ टक्के कर्मचारी दर आठवड्याला ४९ किंवा त्याहून अधिक तास काम करतात. या यादीत भूतान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भूतानमध्ये ५४ टक्के कर्मचारी दर आठवड्याला ४९ किंवा त्याहून अधिक तास काम करतात. लेसोथो या यादीत चौथ्या स्थानावर आहे, जिथे ३६ टक्के कामगार दर आठवड्याला ४९ तास किंवा त्याहून अधिक काम करतात.

दर आठवड्याला सर्वात जास्त तास काम करणारे देश

संयुक्त अरब अमिराती (युएई) – ५२.६ तास
गॅम्बिया – ५०.८ तास
भूतान – ५०.७ तास
लेसोथो – ४९.८ तास
काँगो – ४८.६ तास
कतार – ४८ तास
भारत– ४७.७ तास
मॉरिशस – ४७.५ तास

विकसित देशांमध्ये कमी काम
आश्चर्याची बाब म्हणजे, १६३ देशांच्या या यादीत ब्रिटन (यूके), युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि कॅनडा यांसारखे विकसित देश तळाशी आहेत. तर चीन १६ व्य क्रमांकावर आहे. चीनमध्‍ये काम करण्‍याचा सरासरी वेळ दर आठवड्याला ४६.१ तास आहे. याव्यतिरिक्त, यूएसए, ११५ व्या क्रमांकावर आहे. तिथे दर आठवड्याला सरासरी केवळ ३६.४ तास काम केले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR