36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडामुंबईने टॉस जिंकून चेन्नईला दिले फलंदाजीचे आमंत्रण

मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला दिले फलंदाजीचे आमंत्रण

मुंबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला एल क्लासिको सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सीएसकेने पाच पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर एमआयला ५ मध्ये २ विजय मिळवता आले आहेत. हे दोन्ही विजय मुंबईने घरच्या मैदानावरील मागील दोन सामन्यांत मिळवले आहेत. तेच चेन्नईला प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर यंदाच्या पर्वात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे.

आयपीएल इतिहासात प्रथमच सीएसके विरुध्द एमआय सामन्यात ना धोनी कर्णधार आहे, ना रोहित… हार्दिक पांड्या व ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एमआय व सीएसकेने या पर्वाची नवी सुरुवात केली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माला एक विक्रम खुणावतोय त्याने १० धावा केल्यास तो एमआय विरुध्द सीएसके सामन्यांत सर्वाधिक धावांचा सुरेश रैनाच्या ( ७१०) विक्रमाशी बरोबरी करेल. उभय संघांमध्ये आतापर्यंत ३६ सामने झाले आहेत आणि त्यापैकी २० सामने मुंबईने, तर १६ सामने चेन्नईने जिंकले आहेत. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने ६ बाद २१६ धावा केल्या होत्या आणि त्या सीएसके विरुद्ध त्यांच्या सर्वोच्च धावा ठरल्या. तेच २०१३ मध्ये सीएसकेने मुंबईविरुद्ध ७९ ही निचांक धावसंख्या नोंदवली होती.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दव फॅक्टर महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेतल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले. मुंबईच्या ताफ्यात आज कोणताही बदल नाही, परंतु चेन्नईने मथिशा पथिराणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेताना महिशा तिक्षणाला विश्रांती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR