34.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन‘पुष्पा २’ मधील श्रीवल्लीची पहिली झलक झाली व्हायरल

‘पुष्पा २’ मधील श्रीवल्लीची पहिली झलक झाली व्हायरल

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित कोणतीही बातमी व्हायरल होताच चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढताना दिसते. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओत चाहत्यांना श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाची झलक पाहायला मिळाली आहे. रश्मिका मंदानाची झलक पाहिल्यानंतर चाहते उत्साहित झाले आहेत.

‘पुष्पा २’ मध्ये कलाकारांचा लूक, शूटिंग आणि इतर सर्व गोष्टी सुरुवातीपासून लपवून ठेवल्या जात आहेत, दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि दागिने परिधान करून रश्मिका मंदाना खूपच सुंदर दिसत आहे.शूटिंग आजूबाजूला बरेच चाहते जमले आहेत, ते रश्मिका मंदान्नाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसत आहेत. रश्मिकाच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना हा श्रीवल्लीचा फर्स्ट लूक आहे, असे कॅप्शन लिहिले आहे.

१५ ऑगस्टला होणार रिलीज
‘पुष्पा २’ हा यावर्षी १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय फहद फासिल, जगदीश प्रताप भंडारी, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश हे कलाकारही ‘पुष्पा २’ मध्ये दिसणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR