38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसौदी अरेबियाने केले भारताच्या भूमिकेचे समर्थन

सौदी अरेबियाने केले भारताच्या भूमिकेचे समर्थन

रियाद : सौदी अरेबियाने काश्मीरच्या मुद्यांवरून पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे. इतकेच नाही तर हा विषय भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून सोडवावा लागेल असे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ रियाज दौ-यावर आलेले असताना सौदी अरेबियाच्या प्रिंसने ही भूमिका स्पष्ट केली आहे.

पाकिस्तान आतापर्यंत काश्मीर मुद्यांवर संयुक्त राष्ट्र संघात आवाज उचलत होता. परंतु भारत सुरुवातीपासून हा विषय द्विपक्षीय असल्याचं सांगत होता. दहशतवादाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही वर्षापासून राजकीय संबंध दुरावले आहेत. यातच सौदी अरेबियाने शांतता आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांनी बहुचर्चित विशेषत: जम्मू काश्मीर वादावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला. क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमा आणि शहबाज शरीफ यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सौदी अरेबियाने त्यांची भूमिका सांगितली. याआधी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री यांनी भारतातील जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लोकसंख्येचं समर्थन करत या भागातील सुरक्षा आणि स्थिरता मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. जर हा मुद्दा सोडवला गेला नाही तर संपूर्ण भागात अस्थिरता पसरेल.

इस्लामची ओळख आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सौदी अरेबिया जम्मू काश्मीरातील मुस्लीमांचे समर्थन करते असं त्यांनी म्हटलं होते. सौदी अरेबियाच्या या विधानामुळे अनेक चर्चा झाल्या. सौदी अरेबियानं भारताचा विश्वासघात केला असं बोलले गेले. मात्र आता खुद्द सौदी अरेबियाच्या ंिप्रसनं पाकिस्तानच्या पंतप्रधानासमोर हे विधान करत जम्मू काश्मीर प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेतून मार्ग निघेल ती द्विपक्षीय चर्चा आहे असं स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR