34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीमोफत सर्वरोगनिदान शिबिरात १४७० रूग्णांची तपासणी

मोफत सर्वरोगनिदान शिबिरात १४७० रूग्णांची तपासणी

परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १६ मध्ये संयुक्तरित्या आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन रविवार, दि.२५ रोजी सुमनताई गव्हाणे विद्यालय, वर्मा नगर येथे करण्यात आले होते. या शिबिरात २०० रूग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. २५० रूग्णांची हाडांची तपासणी करून त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या. या शिबिराचा एकुण १४७० रूग्णांनी लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक नावंदर, मिलिंद खिल्लारे, सय्यद हुसेन, कैलास पतंगे, रामराव डोंगरे, सुशिलाबाई निसर्गन, सखाराम बगाटे, संदीप पंडित, चंद्रशेखर धुळे, कार्तिक जाधव, नितेश फुलवरे, शेख जाफर, श्रीमती पंचांगे, पंडित निकाळजे, भाग्यवंत, शेख वसीम, उत्तरेश्वर गायकवाड, सोनी सिंग, दलवीर सिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. डॉ. पाटील म्हणाले, मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा या संकेल्पनेच्या माध्यमातून आजपर्यंत १० हजारांवर नागरीकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच वेळावेळी ग्रामीण व शहरातील प्रत्येक प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सापडलेल्या मोतीबिंदू रूग्णांवर आरपी हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तसेच अन्य आजारांच्या रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना पूर्णत: मोफत औषधोपचार देखील करण्यात येत असल्याचे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले.

माजी नगरसेवक सुशील कांबळे यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, कान, हाडाची तपासणी, बीपी, शुगर तपासणी, सर्व लहान बालके, महिला, वृद्धांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. या शिबिरात हजारो ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य समन्वयक राहुल कांबळे, मकरंद कुलकर्णी, राहुल गायकवाड, संदीप आस्वार, गंगाराम खंदारे आदीसह मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR