40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडशिवसेना आ. कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक

शिवसेना आ. कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेना आ. बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केली असावी असा संशय आहे.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. बालाजीराव कल्याणकर हे रविवारी १७ मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. दुपारच्यावेळी लग्न मंडपाबाहेर उभ्या असलेल्या एमएच २६ बीसी ७७७१ या गाडीवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या आहेत.

यावेळी गाडीत आमदार अथवा चालक नव्हता, यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. यापुर्वी काही आमदार, खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR