37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगरोबोट बनवणार मर्सिडीजच्या गाड्या

रोबोट बनवणार मर्सिडीजच्या गाड्या

बुडापेस्ट : लग्झरी कार म्हटले की, मर्सिडीज-बेंझ कंपनीचे नाव अग्रगण्य कंपन्यांमध्ये येते. या कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी कारच्या उत्पादनासाठी आता चक्क रोबोट्सची मदत घेणार आहे. आपल्या फॅक्टरीमदील कामगारांना मदत म्हणून हे रोबोट काम करतील असे कंपनीने म्हटले आहे.

यासाठी मर्सिडीजने ऍपट्रॉनिक या रोबोट बनवणा-या कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी मर्सिडीजला ‘अपोलो’ नावाचे रोबोट बनवून देणार आहे. मानवी मेहनत लागणारी कित्येक कामे यामुळे ऑटोमेटेड होणार आहेत, असे कंपनीने सांगितले.

कार बनवण्यासाठी लागणारे अवजड सुटे पार्ट उचलून ते कामगारांपर्यंत आणून देणे, तसेच असेम्बल झालेले पार्ट पुन्हा दुसरीकडे नेऊन ठेवणे अशा कामांसाठी अपोलोचा वापर केला जाऊ शकतो. एवढेच नाही, तर कंपोनंट्सची चाचणी करण्यातही हा रोबोट तरबेज आहे.

कसा आहे अपोलो रोबोट?
अपोलो रोबोटची उंची ५ फूट ८ इंच एवढी आहे. त्याचे वजन १६० पाऊंड (७२.५ किलो) आहे. हा रोबोट ५५ पाउंड (२५ किलो) पर्यंत वजन उचलू शकतो. तसेच ब्रेकची आवश्यकता असल्यास हा रोबोट स्वत:च स्वत:ला चार्जिंगला लावू शकतो. कारखान्यांमध्ये मानवांसोबत काम करण्यासाठीच हा रोबोट डिझाईन तयार केला आहे.

मर्सिडीजप्रमाणेच इतर कंपन्याही लवकरच आपला रोबोट कारखान्यांमध्ये वापरण्यास सुरू करतील असा विश्वास अपोलोचे सीईओ आणि सह-संस्थापक जेफ कार्डेनास यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR