38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडासिध्दू करणार कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन

सिध्दू करणार कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन

आयपीएल २०२४ मध्ये करणार समालोचन

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२४ सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस उरले आहेत. २२ मार्च रोजी चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात सामने होणार आहेत. पण याआधी नवज्योत सिंग सिद्धू कॉमेंट्री बॉक्समध्ये परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. सिद्धू त्याच्या शायराना अंदाजमध्ये उत्कृष्ट कॉमेंट्री करण्यासाठी ओळखला जातो. सिध्दू जेंव्हा समालोचन करतो तेंव्हा क्रिकेटची मजा द्विगुणित होते.

२२ मार्चपासून सुरू होणा-या आयपीएल २०२४ लीग मध्ये नवज्योतसिंग सिद्धू कॉमेंट्री बॉक्समध्ये परतणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू पसरवताना दिसणार आहे. मंगळवारी खुद्द स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. स्टार स्पोट्सने एक पोस्टर शेअर करून लिहिले की, कॉमेंट्री बॉक्सचे नवज्योत सिंग सिद्धू परत आले आहेत. विविध कारणांमुळे सिद्धू बराच काळ समालोचनापासून दूर होता. पण, आता तो आएपीयलच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील होणार आहे.

सध्या देशात लोकसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, काँग्रेस नेते सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीपासून दुर राहणे पसंद केले आहे. पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिध्दूने निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.

कोणते दिग्गज करणार कॉमेंट्री ?
हिंदी समालोचकांची यादी : रजत भाटिया, दीपदास गुप्ता, रमन भानोत, विवेक रमदान, पद्मजित शेरावत, जतीन सप्रू , मोहम्मद कैफ इरफान पठाण, हरभजन सिंग, नवज्योत सिंग सिद्धू , सुनील गावस्कर, रवी शास्त्री, अंबाती रायडू, वरुण आरोन, संजय बांगर, उन्मुक्त चंद, इम्रान ताहिर, वसीम जाफर, गुरकीरतमन, यांच्या नावांचा समावेश आहे. यासोबतच मिताली राज ही आयपीएल २०२४ मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.

इंग्रजी समालोचकांची यादी : इंग्रजी समालोचकांच्या यादीत सुमेल बद्री, केट मार्टिन, ग्रॅमी स्मिथ, दीपदास गुप्ता, रोहन गावस्कर, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, डब्ल्यूव्ही रमन, डेरे गंगा, हर्षा भोगले, मार्क हॉवर्ड, नताली जर्मन हे आयपीएल २०२४ मध्ये कॉमेंट्री करताना दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR