40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयबेंगळुरुमध्ये शाळेजवळ गाडीमध्ये आढळली स्फोटके

बेंगळुरुमध्ये शाळेजवळ गाडीमध्ये आढळली स्फोटके

बेंगळुरु : रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका गाडीमधून स्फोटके जप्त केली आहेत. बेल्लांदूर प्रक्रिया शाळेजवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये पोलिसांना स्फोटके आणि जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन नोंदणी नसलेले इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर देखील जप्त केले. बेंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये तीन आठवड्यांपूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रीय झाली होती.

रामेश्वरम कॅफेमधील स्फोट
बेंगळुरुतील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी सौम्य स्वरुपाचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. एका व्यक्तीने कॅफेमध्ये येऊन स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली होती. त्यानंतर एक तासांनी कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

तपास यंत्रणांनी एका संशयिताला अटक केली. आरोपीवर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR