36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव

उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव

बारामती विकासाचे दिले क्रेडिट

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विकास कामाचे कौतुक केले. बारामतीचा विकास हा अजित पवारांच्या ध्येयधोरणांनी झाला आणि त्यांच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे. घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, जीव ओतून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत.

अजित पवारांमुळेच बारामतीचा विकास
गेल्या १० वर्षांत बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या २५ वर्षांत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे तर बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे.

भारताचा विकास म्हणजे मोदींची किमया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा चांगला विकास केला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. मोदी देशासाठी जीव झोकून काम करत आहेत. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगळयान, चांद्रयान यासारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असेही त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, विजय शिवतारे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR