36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeराष्ट्रीय३ अपघातांत २१ ठार

३ अपघातांत २१ ठार

गुजरातमध्ये १०, सांगलीत ७, बुलडाण्यात चौघांचा मृत्यू

अहमदाबाद/सांगली/बुलडाणा
अपघात वार ठरावा, अशी आज वेगवेगळ््या ३ ठिकाणी भीषण अपघात झाले आणि या तिन्ही ठिकाणी एकूण २१ प्रवासी ठार झाले. यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात पाठीमागून आलेली कार थेट उभ्या टँकरवर जाऊन आदळली आणि या भीषण अपघातात १० ठार झाले. इकडे सांगली जिल्ह्यात लग्नाला निघालेली क्रूझर गाडी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने ७ व-हाडी ठार झाले, तर नवरीला हळद लावण्यासाठी निघालेली स्कॉर्पिओ पलटी होऊन झालेल्या अपघातात ४ ठार झाले. एकाच दिवशी एकूण ३ अपघातांत २१ जणांचा बळी गेली आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटनेत १० जणांचा जागीच मृत्यू झाला.

गुजरातच्या अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवरील नडियादजवळ हा भीषण अपघात झाला. ऑईल टँकरच्या पाठीमागून आलेली कार टँकरला जोरात धडकली. त्यामुळे कारमधील १० जणांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने हा टँकर एक्स्प्रेस वेवर रस्त्याच्या बाजूला उभा होता. पुण्यातून जाणारा हा टँकर जम्मूकडे जात होता. परंतु बिघाड झाल्याने वाटेतच थांबला होता. या उभ्या टँकरला कार धडकली.

वडोदरा येथून निघालेली ही कार अहमदाबादला जात होती. कारमधून १० प्रवासी प्रवास करत होते. दुर्दैवाने एक्स्प्रेस वेवर टँकरला धडक बसल्याने कारमधील १० पैकी ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये ८ पुरुष, १ महिला आणि एका ५ वर्षीय बालकाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण केल होते. त्यानंतर दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, त्यातून रुग्णालयात नेण्यात आले.

बुलडाण्याजवळ ४ ठार
बुलढाणा : नवरीला हळद लावण्यासाठी जालन्याला निघालेल्या अंबाशी येथील देशमुख कुटुंबियांवर काळाने घाला घातला. नवरदेवाकडची भरधाव स्कार्पिओ देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर दगडवाडी जवळ पलटी झाली. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात देशमुख कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कार्पिओच्या चालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंबाशी तालुका चिखली येथील देशमुख कुटुंबात उद्या १८ एप्रिल रोजी लग्न होते. या लग्नाआधी नवरीला हळद लावण्यासाठी दोन वाहने जालना येथे जाण्यासाठी निघाली होती. यातील स्कार्पिओ जीप क्रमांक एम एच २८ बी क्यू ०६०६ यावरील चालकाचा ताबा सुटून गाडी दगडवाडी फाट्याजवळ पलटी झाली आणि भीषण अपघात घडला.

सांगली जिल्ह्यात
७ जण मृत्युमुखी
सांगली जिल्ह्यातील तासगावमधील सावर्डे येथे लग्नासाठी निघालेल्या व-हाडाचा विजापूर-गुहागर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी येथे भीषण अपघात झाला. तासगावमधील सावर्डेमध्ये उद्या विवाह पार पडणार होता. यासाठी कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील चिखलगी गावातील व-हाड जात होते. हे व-­हाड कवठेमहांकाळ तालुक्यातील चिखलगी येथे आल्यानंतर क्रुझर चालकाचा क्रुझरवरील ताबा सुटला आणि क्रुझरने ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली. दोन क्रुझर तसेच नवरी मुलीसाठी स्वीफ्ट होती. ही वाहने बुधवारी सायंकाळी विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभुळवाडी येथे आली. यावेळी १४ जण बसलेल्या क्रुझरने पाठीमागून ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात पाच जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR