34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीचा २१-१७-१० चा फॉर्म्युला

महाविकास आघाडीचा २१-१७-१० चा फॉर्म्युला

२१-१७-१० चा फॉर्म्युला जाहीर मविआच्या पत्रकार परिषदेत माहिती

 

मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा आज अखेर सुटला. शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यामध्ये जागाटपाचा फॉर्म्युला आणि मतदारसंघांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना २१, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढणार आहे. जागावाटपाची घोषणा झाली. यामध्ये सांगलीच्या जागेवरून वाद होता. मात्र, सांगलीची जागा शिवसेनेकडेच राहणार आहे, तर धुळे, जालना कॉंग्रेसकडे राहणार आहे. तसेच मुंबई उत्तर-मध्य आणि उत्तर मुंबईची जागाही कॉंग्रेसकडे राहणार आहे. दरम्यान आतापर्यंत ब-याच उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. आता फक्त सात जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या २१ उमेदवारांची घोषणा याआधीच केली आहे तर काँग्रेसकडून १३ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत तर शरद पवार यांच्या पक्षाने ७ जागांवर उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांचा तीन जागांवर उमेदवाराची चाचपणी सुरु आहे, त्यासाठी इच्छूकांच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. काँग्रेसकडून ४ जागांसाठी चाचपणी सुरु आहे.

शिवसेना- २१ जागा

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलडाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य

काँग्रेस- १७ जागा
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

शरद पवार गट- १० जागा

बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अमहमदनगर दक्षिण, बीड

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR