29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणप्रश्नी सरकार गंभीर

मराठा आरक्षणप्रश्नी सरकार गंभीर

हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचीही आज तोडफोड करण्यात आली. मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी सरकार गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही यासंदर्भात बैठक झाली. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा लागेल. कोर्टात काय होईल, काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ते पुढे म्हणाले की, आज माझ्या गाडीवर दगडफेक झाली. दगडफेक करणा-यांवर कठोर कारवाई करू नये असे मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे. आमदारांचे कुटुंबीय घरात असताना त्यांची घरं जाळणं हे दुर्दैवी आहे. अशा घटना अजिबात होऊ नयेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. त्यामुळे सहानुभूती जाते, याचा विचार नेतेमंडळी आणि तरुणांनी केला पाहिजे.

‘‘मराठा आंदोलनात नेतृत्व दिसत नाही. आंदोलनाची दिशा कशी असावी हे समजून सागावं लागेल. अशा घटनांमध्ये स्थानिक विरोधक भाग घेऊन आंदोलन करत आहेत का अशी शंका आहे. सत्ताधारी स्वत:च्या आमदारांची घरे आणि गाड्या जाळतील का? स्थानिक पातळीवरचं राजकारण असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत’’, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR