30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यालवासा घेतले, त्यांचे दिवस फिरले, मुंबई, गोव्यासह ९ ठिकाणी छापे

लवासा घेतले, त्यांचे दिवस फिरले, मुंबई, गोव्यासह ९ ठिकाणी छापे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी संबंधित असलेला पुण्यातील लवासा प्रकल्प बुडाला होता. हा प्रकल्प अजय स्ािंह यांच्या डार्विन कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपये मोजून विकत घेतला होता. आता ही कंपनी आणि संबंधित कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या असून दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ८० लाख रुपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ईडीने डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कंपनीवर छापे मारले आहेत. ही कंपनी कायदेशीर, ऑडिटिंग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करते. अजय सिंह आणि त्याच्या साथीदारांच्या ठिकाण्यांहून ७८ लाख रुपये भारतीय चलन, २ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. हरिप्रसाद अकालू पासवान आणि रमेश यादव कुमार हे या कंपनीचे संचालक असून ती लवासा विकत घेतलेल्या डार्विन कंपनीचे मालक अजय स्ािंह यांच्या नियंत्रणात आहे.

डलेमन आणि इतरांनी वेस्टिज मार्केटिंग कंपनीच्या बँक खात्यातून फसवणूक करत १८ कोटी रुपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप आहे. याच दिवशी ही रक्कम डलेमनच्या बँक खात्यातून डार्विन ग्रुप ऑफ कंपनीजच्या अनेक बँक खात्यांमध्ये तसेच अजय सिंहच्या जवळच्या सहका-यांच्या बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR