30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरशिवरत्नवर झालेल्या बैठकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल

शिवरत्नवर झालेल्या बैठकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल

अकलूज /प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्र पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अकलूज येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये सोलापूर माढा बारामती लोकसभा मतदार संघाविषयी व्यूहरचना करण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले सोलापूर जिल्हा हा नेहमी गांधी नेहरू यांच्या विचाराचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे इतिहास पाहता सोलापूर व माढा येथील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यानिमित्ताने अकलूज मध्ये झालेल्या या बैठकीचा पूर्ण महाराष्ट्रभर संदेश जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा परिणाम होईल भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासन दिली पण कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही निवडणुका आले की लोकांना आश्वासन देण्याचे काम भाजप करत आहे परंतु त्याचा अंमल केला जात नाही हे चुकीचे आहे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे युवक नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा एका मतदारसंघापुरता सिमित राहणार नाही, तर तो राज्यभरात जाईल. त्यातून मागील लोकसभा निवडणुकीतील चित्र या वेळी बदलेले दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही लोकांनी आमच्या सहकार्यांना आढावा घेतला. सुशीलकुमार शिंदे, आमचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, तसेच मतदारसंघातील महत्वाचे नेते आज उपस्थित आहेत. उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सोलापूर हा गांधी, नेहरूंचा विचार जपणारा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. माण खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढ्यातील महत्वाचे नेते आज उपस्थित आहेत. त्यातून त्यांनी निवडणुकीत यश देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, भाजपने शेतीमालाच्या किमतीबाबत दिलेले आश्वासन पाळलं नाही. त्यांनी अनेक आश्वासने पाळलेली नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, माजी आमदार रामहरी रुपनवर, माढ्याचे धनाजी साठे, माजी जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, शिवाजी कांबळे, टेंभूर्णीचे संजय कोकाटे, संकल्प डोळस, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा कविताताई म्हेत्रे, काँग्रेसचे चेतन नरोटे,सुरेश हसापुरे,राजू सुपाते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, पंढरपूरचे अभिजीत पाटील, संजय पाटील घाटणेकर, भारत पाटील, करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, रामोशी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत चव्हाण, फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर,अनिल देसाई, बाबासाहेब माने, माण खटावचे रणजीत देशमुख, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बारामतीचे श्रीनिवास पवार, सांगोल्याचे बाबुराव गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR