32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर

काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. देशपातळीवर काँग्रेसची ही चौथी यादी असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील १, जम्मू-काश्मीरमधील २, मध्य प्रदेशधील १२, महाराष्ट्रातील ४, मणिपूरमधील २, मिझोराममधील १, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील २ तर पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने राज्यातील पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये राज्यातील सात उमेदवारांचा समावेश होता. दुस-या यादीसह काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकूण ११ उमेदवारांची घोषणा झाली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेसच्या दुस-या यादीतील उमेदवार
रामटेकमधून रश्मी बर्वे
भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे
नागपूरमधून विकास ठाकरे
गडचिरोलीमधून नामदेव किरसान

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR