34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीययूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने बुधवारी (दि. २०) लोकसभा निवडणुकीमुळे २६ मे रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा १६ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि इतर अधिकारी निवडण्यासाठी यूपीएससी दरवर्षी तीन टप्प्यांत नागरी सेवा परीक्षा आयोजित करते.

यूपीएससीने सांगितले की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक पाहता, आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’ परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाईन जारी केले जातील. निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्व परीक्षा १६ जूनला होणार असून मुख्य परीक्षा २० सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे.

यापूर्वी, आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२४ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील वाढवली होती. अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR