Homeलातूरलक्ष्मी अर्बन बँकेस बेस्ट डिजिटल बँक पुरस्कार प्रदान

लक्ष्मी अर्बन बँकेस बेस्ट डिजिटल बँक पुरस्कार प्रदान

लातूर : प्रतिनिधी
सहकार व बँकिंग या वित्तिय क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणा-या सहकारी बँकेस देण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा बेस्ट डिजिटल बँक हा पुरस्कार लक्ष्मी  अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर या बँकेस प्रदान करण्यात आला.
नागरी सहकारी बँक टियर-२ गटातील प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस  महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन लि, मुंबई व क्रेष्ट इन्फोमिडिया यांच्यातर्फे आयोजित १० व्या अखिल भारतीय अर्बन को-ऑप. बँक संमेलनामध्ये क्रेष्ट इन्फोमिडिया चे सीईओ गौतम नवीन व सिंगटेक अँड ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ व कार्यकारी संचालक  सुजित सिंग यांच्या हस्ते दि. ९ मे रोजी हॉटेल दि वेस्टीन कोरेगाव पार्क, पुणे येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेचे व्हाईस चेअरमन सतीश भोसले, तज्ज्ञ संचालक सीए राजेश अग्रवाल, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, आयटी अधिकारी सुहास राजमाने उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. सदरील पुरस्कार बँकेस मिळणे हे अभिमानास्पद आहे. सदर पुरस्कारासाठी तज्ज्ञ समितीने बँकेच्या कार्याचे मूल्यांकन करून निवड केली आहे.
या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम तसेच बँकेचे स्थानिक सल्लागार, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे मत, बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. अशोक अग्रवाल यांनी संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक  यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR