40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडअपघाताच्या ३ घटनांमध्ये ४ ठार

अपघाताच्या ३ घटनांमध्ये ४ ठार

नांदेड: प्रतिनिधी
मंगळवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तीन अपघात घडले असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे वेगवेगळ्या कारणास्तव वाहनावर जाणा-यांसाठी आजचा दिवस अपघातवार ठरला आहे. एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील मार्कंड येथील रामदास ज्ञानोबा पांचाळ (वय ४५) हे पत्नी अल्का पांचाळ समवेत दुचाकीवर जात होते. विष्णुपुरी जवळील श्रीलक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ समोरून भरधाव वेगात येणा-या बोलेरो या चारचाकी वाहनाने पांचाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. समोरासमोर घडलेल्या या अपघातात रामदास ज्ञानोबा पांचाळ व अल्का पांचाळ (वय ४०) हे जागीच ठार झाले. घटना घडताच बोलेरो वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयलाने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर बोलेरो वाहनही ताब्यात घेतले. पांचाळ दांपत्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती कळताच मार्कंड गावावर शोककळा पसरली असून पांचाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघात घडून चार तास झाले तरी या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे याची नोंद ठाण्यात झाली नव्हती.

नायगाव तालुक्यात १ ठार
नायगाव : तालुक्यातील राहेर येथुन आपल्या मोटारसायकलवर शेळगाव गौरी येथील कार्यक्रमाला जाणा-या इसमाला एका स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दि.२६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता हिप्परगा माळ शिवारात ही घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी शिवाजी इंगळे (वय ४६) हे मोटरसायकवर (क्र.एम.एच.२६ क्यु ५२५१) शेळगाव गौरी येथे एका कार्यक्रमाला जात होते. हिप्परगामाळ शिवारात आल्यानंतर पेट्रोलपंपाच्या बाजूला समोरून आलेल्या एका भरधाव स्कार्पिओने (क्र.जी.जे.०८ सी.एस.३०२६) इंगळे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की इंगळे यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. घटनेची माहिती रामतीर्थ पोलिस ठाण्याचे स.पो.नि.जगताप यांना कळताच त्यांनी संभाजी इंगळे यांना नायगाव येथील रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संभाजी शिवाजी इंगळे यांच्या पश्चात आई वडील, पत्नी एक मुलगा, तीन मुली असा मोठा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR