36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडबाजारभावात मतदारांपेक्षा जनावरांची किंमत अधिक!

बाजारभावात मतदारांपेक्षा जनावरांची किंमत अधिक!

नांदेड : विशेष प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहितादेखील लागली आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात पैसा वाटप होऊ शकत नाही. त्यामुळे काही महाभागांनी आतापासूनच तयारी सुरू केली असल्यामुळे सोशल मिडियावर अशा व्यवहारावर भाष्य करणारी एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या काळात जनावरांपेक्षा कमी भावात मतदार विकल्या जात आहे. त्यामुळे स्वाभिमानाने मतदान करा आणि पाच वर्ष हक्काने विकासासाठी छाताडावर बसा, असा संदेश देणारा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. विविध स्पर्धा, प्रचार, प्रसार करून निर्भिडपणे मतदान करा, असे सांगत आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात मतदार मात्र केवळ पैशाच्या लोभापायी मतदान करून आपला स्वाभिमान गहाण ठेवत आहे. आजघडीला माणसाच्या मताची किंमत ५०० ते १००० रुपये आहे. परंतु बाजारात म्हैस ८० हजार, बैल ५० हजार, शेळी १० हजार, कुत्रा ५ हजार असा आजचा भाव आहे. म्हणजे कुत्र्यापेक्षाही कमी किंमतीत मतदार स्वत:ला विकतो. काही ठिकाणी तर केवळ क्वॉर्टर आणि मटनाचा डब्बा व बायकोसाठी साडी यावर देखील मतदान विकल्या जात असल्याचे दृश्य उघड्या डोळ्यांनी पहावयास मिळत आहे.

त्यामुळे येणा-या निवडणुकीत कुठलाही पैसा, कुठल्याही मार्गाने, कोणाकडूनही घेऊ नका. स्वभिमानाने मतदान करा आणि पुढील पाच वर्ष छाताडावर बसून विजयी उमेदवाराकडन्ूा विकासाची कामे करून घ्या, असे मत सोशल मिडियामार्फत व्हायरल होत आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन कितीही कडक राहिले तरी स्वत:च्या मनावर निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील पाच वर्षे हाच उमेदवार तुम्ही त्याच्या दारी उभे राहिल्यानंतर तुम्ही घेतलेल्या आमिषाची आठवण तुम्हाला करून देईल आणि स्वत: ‘खोक्याने’ पैसे कमविल! त्यावेळी तुम्हाला बोलण्याची संधी राहणार नाही. त्यामुळे आताच जागरूक व्हा आणि निर्भिडपणे मतदान करा, असे संदेश दिल्या जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR