36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडफोर्ड शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

फोर्ड शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

नांदेड: प्रतिनिधी
तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे असलेल्या फ्रिडम्स फोर्ड शोरूम व सर्विस सेंटरला सोमवारी सकाळी १० वा. आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून झाले. घटनेची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.

नांदेड -अर्धापूर रोडवर असलेल्या पिंपळगाव येथे फोर्ड या चारचाकी विक्रीचे केंद्र आहे. फ्रिडम फोर्ड कंपनीच्या वातानुकुलित दालनाला सकाळी १०च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये २ वातानुकुलित कारबरोबरच शोरुमचेही नुकसान झाले. आग लागल्यानंतर तेथील कर्मचा-यांनी इतर साहित्य या आगीपासून दूर केले. त्यानंतर याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी येईपर्यंत या शोरुममधील कागदपत्रे व मशिनरी असे बरेचसे साहित्य जळून खाक झाले. परंतु या आगीमुळे ६० ते ७० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR