29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंनी पोरकट वर्तन थांबवावे

आदित्य ठाकरेंनी पोरकट वर्तन थांबवावे

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर केलेले आरोप बालिश असून आदित्य यांनी आता मोठे व्हावे आणि बालिश वर्तन थांबवावे, तसेच आरोप करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी, असा टोला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत युती सरकारवर आरोप केले होते. सरकारने लोकांसाठी आतापर्यंत काय केले, असा त्यांचा आरोप होता. ठाकरे यांचे हे आरोप धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत, असे प्रत्युत्तर श्रीमती शहा यांनी दिले आहे. त्यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हीडीओ टाकून हे प्रत्युत्तर दिले आहे.

राज्य शासनाने एक कोटी नागरिकांना शासन आपल्या दारी योजनेचा फायदा दिला. औद्योगिकदृष्ट्या राज्याची देशातील आघाडी टिकवून ठेवली आणि देशाची आर्थिक राजधानी हा दर्जाही कायम ठेवला. या सरकारच्या काळात राज्यात साडेतीन लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली.

दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाल्याने आता गोविंदांना नोक-याही मिळतील. त्याखेरीज महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमार्फत सर्व रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचारही नि:शुल्क देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आदित्य यांनी पूर्ण माहिती घ्यावी, असेही श्रीमती शहा यांनी त्यांना सुनावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR