34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीय‘आप’च्या ‘केजरीवालांना आशीर्वाद’ मोहिमेला आजपासून सुरुवात

‘आप’च्या ‘केजरीवालांना आशीर्वाद’ मोहिमेला आजपासून सुरुवात

सुनीता केजरीवाल यांनी जारी केला व्हॉट्सअ‍ॅप नंबर

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी देखील दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अशातच त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘केजरीवालांना आशीर्वाद’ ही नवीन मोहीम सुरू केली असल्याचेही सांगितले. सुनीता केजरीवाल यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केला आणि अरविंद केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, काल अरविंद केजरीवाल यांनी कोर्टात जे सांगितले ते तुम्ही ऐकलेच असेल, नाही ऐकले तर एकदा ऐका. ते न्यायालयासमोर जे बोलले त्यासाठी खूप हिंमत लागते. तो खरा देशभक्त आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीशी नेमका असाच सामना केला होता. गेली तीस वर्षे मी त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या प्रत्येक श्वासात देशभक्ती रुजलेली आहे. त्यांचा लढा असाच सुरू राहील असे सुनीता म्हणाल्या.

‘आप’ची नवीन मोहीम सुरू

सुनीता केजरीवाल पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्वांत भ्रष्ट आणि हुकूमशाही शक्तींना आव्हान दिले आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना आपला भाऊ आणि मुलगा म्हणता, तुमच्या मुलाला या लढ्यात लढण्यासाठी साथ देणार असा मला पूर्ण विश्वास आहे. आम्ही ८२९७३ २४६२४ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ‘केजरीवालांना आशीर्वाद’ ही मोहीम आजपासून सुरू करत आहोत. तुम्ही या नंबरवर केजरीवाल यांना पाठिंबा देऊन आपला आशीर्वाद देऊ शकता, असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR