40.8 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयउच्च न्यायालयाच्या विलंबाविरोधात सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयाच्या विलंबाविरोधात सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. या अटकेला आव्हान देणारी याचिका सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर निर्णय देण्यास उच्च न्यायालय दिरंगाई करत असल्याचे सोरेन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला सांगितले की, सोरेन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजीच निर्णय दिला असता, मात्र, तो देण्यात आला नाही. या प्रकरणाचा निर्णय देण्यास उच्च न्यायालयाकडून दिरंगाई होत आहे, असे सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सोरेन सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी हायकोर्टाने ईडीला सोरेनच्या जामीन याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदत दिली आहे, यामुळे सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR