31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
HomeFeaturedअमिताभ बच्चन यांना 'लता दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार प्रदान

अमिताभ बच्चन यांना ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतल्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात बिग बींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बच्चन यांच्यासोबत मंचावर रणदीप हुड्डा यांचीही उपस्थिती होती.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अभिनेते पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ हा संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी दिला जाणारा पुरस्कार संगीतकार ए. आर. रेहमान जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सायंकाळी ६:३० वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे संपन्न झाला.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन वर्षांपासून देण्यात येत आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. दुसरा पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्यात आला; तर या वर्षीचा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे.

अन्य पुरस्कारार्थींची नावे
उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी देण्यात येणारा पुरस्कार ‘गालिब’ या नाटकाला देण्यात आला. तसेच नाट्य- चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी अशोक सराफ यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा), पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता) यांनादेखील दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोबतच वाग्विलासिनी पुरस्कार मंजिरी फडके यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेसाठी प्रदान करण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल यांना समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR