28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषकॉटन कँडी खाताय?

कॉटन कँडी खाताय?

अनेक वर्षांपासून मिळणारी कॉटन कँडी म्हणजेच बुढ्ढी के बाल बालचमूंच्या फार आवडीची ! अलीकडील काळात कॉलेजगोईंग तरुण-तरुणीही ती खाताना दिसतात. परंतु ती तयार करताना वापरल्या जाणा-या कृत्रिम रंगांमुळे आणि काही घटकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते, अशी माहिती संशोधनांती समोर आली आहे. त्यामुळेच देशातील तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांनी कॉटन कँडीवर बंदी आणली आहे. ‘यामध्ये प्रामुख्याने ‘रोडामाईन बी’ आढळल्यामुळे त्याचे सेवन धोकादायक ठरत आहे. ‘रोडामाईन बी’ला कॅलिफोर्निया आणि यूरोपीय संघात कर्करोगाला पूरक तत्त्व असलेल्या श्रेणीत सामील केले आहे.

बुढ्ढी के बाल म्हणजेच कॉटन कँडी ही लहान मुलांत बरीच लोकप्रिय आहे. ती वेगवेगळ्या रंगात विकली जाते. परंतु ही कँडी आरोग्याला खूपच घातक ठरू शकते. एवढेच नाही तर कर्करोगदेखील होऊ शकतो. या धोक्यामुळे तमिळनाडू आणि पुदुच्चेरी सरकारने ‘बुढ्ढी के बाल’ विकण्यावर बंदी घातली आहे. कारण या काँटन कँडीच्या नमुन्यात कर्करोग निर्माण करणारे रासायनिक घटक आढळून आले.

कोणता रासायनिक घटक?
तमिळनाडूत जप्त केलेल्या कॉटन कँडीच्या नमुन्यात रोडामाइन बी नावाचा रासायनिक पदार्थ आढळून आला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी म्हटले, कॉटन कँडीचे नमुने अन्न सुरक्षा विभाभाकडे पाठविले आणि त्यांच्या चाचणीत कर्करोग निर्माण करणारे रोडामाइन बी तत्त्व आढळून आले. सुब्रमण्यम यांनी अशा घातक पदार्थाच्या विक्रीबाबत इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, खाद्य सुरक्षा अधिनियम २००६ नुसार विवाह सोहळ्यात किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ‘रोडामाईन बी’ युक्त खाद्य पदार्थ तयार करणे, पॅकेजिंग करणे, आयात करणे, विक्री करणे, तयार करणे हा दंडात्मक गुन्हा आहे. यावर बंदी घालण्यामागचे कारण म्हणजे कँडी विक्रते आणि ग्राहक यांच्यात जनजागृती करणे. कँडी निर्मात्यांना या पदार्थातील गंभीर घटकाची जाणीव करून देणे, हा एक उद्देश आहे. बुढ्ढी के बाल हा चविष्ट वाटत असला तरी तो आरोग्यासाठी हानीकारकच आहे कॉटन कँंडीच्या नमुन्याची सरकारी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली, त्यात रोडामाईन बी आढळून आले. या घटकांचा वापर खाद्यपदार्थात करण्यात मनाई आहे. यामुळे या घटकांचे सेवन हानीकारक ठरू शकते. पुदुच्चेरी येथेही कॉटन कँडीचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी पुदुच्चेरीने रोडामाईन बी च्या दुष्परिणामाचे आकलन करता त्या पदार्थावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

छापेमारी : चेन्नईच्या खाद्य सुरक्षा विभागाने गेल्या काही दिवसांत मरीना बीच आणि अन्य भागात कॉटन कँडीची विक्री करणा-यांना स्टॉलवर छापे घातले. त्याचे काही नमुने गोळा केले. त्याच्या चाचणीत रोडामाईन बी आढळून आले. या चाचणीत औद्योगिक डाय देखील आढळून आले. हा डाय कँडीला कृत्रिम रंग आणण्यासाठी केला जातो. रोडामाइन बी :‘रोडामाईन बी’ चा वापर हा साधारणपणे वस्रोद्योगात केला जातो. हा घटक पदार्थ हानीकारक आहे. खाद्यपदार्थाच्या माध्यमातून हा घटक शरीरात जाईल तेव्हा तो ऊती (टिश्यू) आणि पेशींत ऑक्सिटिव्ह स्ट्रेस निर्माण करतो. हा ताण बराच काळ राहिल्यास कर्करोगाची शक्यता राहते किंवा यकृत खराब होते. रोडामाईन बी जेव्हा पाण्यात मिसळतो, तेव्हा तो एक चमकदार गुलाबी रंग धारण करतो. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने रताळ्यात ‘रोडामाईन बी’ चे मिश्रण करत असताानाचा व्हिडिओ जारी केला होता. रोडामाईन बीचा वापर हा भाजीपाल्यांस चमकदार गुलाबी रंग येण्यासाठी केला जातो.

केवळ तमिळनाडूतच नाही तर संपूर्ण पुदुच्चेरीतही कँडीचे उत्पादन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल तमिळसाई सौंदराजन यांनी राज्यातील कॉटन कँडीची विक्री करणा-या दुकानांची पाहणी करण्याचे आणि रोडामाईन बी युक्त पदार्थ जप्त करण्याचे निर्देश दिले. यावरून या पदार्थाचे गांभीर्य लक्षात येते. प्रामुख्याने लहान मुलांना रंगभेसळयुक्त पदार्थाच्या सेवनाबाबतही इशारा दिला आहे. या ठिकाणी सरकारी अन्न चाचणी प्रयोगशाळेत नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि गुलाबी कँडीत रोडामाईन बी आढळून आले. त्याचवेळी निळ्या रंगाच्या कँडीत रोडामाईन बी आणि अन्य अज्ञात रासायनिक पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही नमुने दर्जाहिन आणि मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचे खाद्य विश्लेषक सांगतात. घातक परिणाम : मानवावर रासायनिक परिणाम करणारे प्रकरणे थोडीच असली तरी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाचे आकलन केल्यास १५० ग्रॅमपेक्षा कमी सेवन केल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात. ‘रोडामाईन बी’ ला कॅलिफोर्निया आणि युरोपीय संघात कर्करोगाला पुरक तत्व असलेल्या श्रेणीत सामील केले आहे.

वाढता धोका : अलिकडच्या काळात नैसर्गिंक पदार्थाापासून आपण दूर जात असून सिथेंटिक रंगाकडे ओढा वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, आतातरी भारतात सिलबंद खाद्यपदार्थाच्या कव्हरवर इशारेवजा लेबल लावण्याची गरज आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थाचे स्पष्टीकरणही द्यायला हवे. हे पदार्थ हानिकारक अ‍ॅडिटिव्ह आणि कृत्रिम रंगापासून तयार केलेले असतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये गृह व्यवहारविषयक संसदीय स्थायी समितीने यासंदर्भात कडक उपाय करण्याचे प्रस्ताव मांडले होते. त्यात भेसळयुक्क्त पदार्थाची विक्री करणा-यांना किमान सहा महिन्यांची कैद आणि २५ हजार रुपयांच्या दंडाचा समावेश केला होता. सध्याची शिक्षा म्हणजे हा कमाल सहा महिन्याची कैद किंवा एक हजार रुपये दंडापुरतीच मर्यादित आहे. कृत्रिम खाद्य रंग : कृत्रिम खाद्य रंग हा पेट्रोलियम पदार्थापासून निर्माण करतात. हे रंग कितपत सुरक्षित असतात यावरून वाद आहेत. कृत्रिम रंग देऊन अन्नपदार्थ आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी खाद्य रंग तयार केला जातो. आपल्याकडे अनेक काळांपासून भोजनात रंग मिसळला गेला आहे. परंतु पहिला कृत्रिम खाद्य रंग हा १८५६ मध्ये ‘तारकोल’ने तयार केला होता.

काही वर्षांत शेकडो कृत्रिम खाद्य रंगाचा विकास करण्यात आला. त्यातील बहुतांश पदार्थात विषारी घटक आढळून आले. काही रासायनिक रंग आज भोजनातही सर्रासपणे आढळून येतात. हॉटेलमध्येही बिनदिक्कत वापरले जातात. हॉटेलच्या लाल किंवा हिरव्या भाजीचा रंग हा नैसर्गिक असतोच असे नाही. खाद्य उत्पादक आपला पदार्थ अधिक आकर्षक करण्यासाठी साधारणपणे बिटा कॅरोटिन आणि बिट झाडाचे मूळ यासारखा नैसर्गिक खाद्य रंग येण्यासाठी कृत्रिम रंग तयार करण्यास प्राधान्य देतात. कारण हे खाद्यरंग पदार्थात अधिक जीवंतपणा आणतात. अर्थात कृत्रिम खाद्य रंगाच्या सुरक्षेवरून बराच वाद आहे. सध्या आहारात वापरल्या जाणा-या कृत्रिम रंगातील विषाक्त घटक जाणून घेण्यासाठी प्राण्यांवर चाचणी करण्यात आली. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी कृत्रिम खाद्य रंगाचा वापर केला जातो आणि त्याचे प्रकार सांगता येईल.

रेड नंबर ३ (एरिथ्रोसिन) साधारणपणे कँडी, पॉप्सिकल्स आणि केकची सजावट करणा-या ‘जेल’मध्ये वापरण्यात येणारा लाल रंगाची ही एक चेरी आहे. रेड नंबर ४० (एल्यूरा रेड) स्पोर्ट्स ड्रिंक्स, कँडी, मसाले आणि धान्यांत वापरला जाणारा हा एक गडद लाल रंग आहे. पिवळा नंबर ५ (टारट्राझिन) कँडी, सोडा, बटाटयाचे चिप्स, पॉपकॉर्न, धान्यांत आढळून येणारा पिवळसर लिंबू रंग यलो नंबर ६ (सनसेट यलो) कँडी, सॉस, शिजवलेले अन्न अणि सिलबंद फळे यात वापरला जाणारा नारंगी आणि पिवळा रंग. निळा नंबर १ (आकर्षक निळा) आईस्क्रम, सिलबंद वाटाणे, पॅकेज्ड सूप, पॉप्सिकल्स आणि फॉस्टिंगमध्ये वापरला जाणारा निळा आणि हिरवा रंग. ब्लू नंबर २ (इंडिगो कारमाइन) कँडी, आइस्क्रिम, धान्य आणि स्रॅक्समध्ये आढळून येणारा रुबाबदार निळा रंग.

– डॉ. जयदेवी पवार

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR