39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeलातूरखोटी माहिती भरल्यास मोफत प्रवेश रद्द होणार

खोटी माहिती भरल्यास मोफत प्रवेश रद्द होणार

लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली असून पालकांना ३० एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहेत. आनलाईन प्रवेश अर्ज भरताना पालकांनी चुकीची माहिती भरल्यास व सदर बाब निदर्शनास आल्यास सदर अर्ज तसेच प्रवेश झाला असल्यास प्रवेशही रद्द होणार आहे. त्यामुळे पालकांना काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा करीता वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणीक द्ष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. १६ एप्रिल पासून लिंक देण्यात आली असून दि. ३० एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.  सदर अर्ज भरताना पालकांनी अवैध निवासाचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अशी चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास येताच सदरील प्रवेश रद्द होणार  आहे.
तसेच विद्यार्थ्यांना निवास स्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानीक स्वराज्य संस्थेच्या शाळा, स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळेत वंचित, दुर्बल व सामाजिक, शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना प्राधान्यक्रम असणार आहे.  २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पूर्वी विनाअनुदानीत, स्वंयअर्थसहायी शाळांचा समावेश होता. मात्र या वर्षापासून प्रथमताच अनुदानित, खाजगी, शासकीय शाळांचाही नोंदणीसाठी  समावेश  करण्यात  आल्याने या  १  हजार  ७३९ शाळेत २८ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे २५ टक्के मोफत प्रवेश होणार आहेत. त्यासाठी दि. १६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आसून ३० एप्रिल पर्यत पालकांना अर्ज भरता येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR