39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeलातूरअवकाळी पावसाने शेतकरी संकटात

अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रभरात भयानक अवकाळी पाऊस आणि गारपीठीने वीज पडुन जिवीतहानी आणि काढणीस आलेल्या पिकांची नासाडी झालेल्या संकटग्रस्त  शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात शासनाने तातडीची अर्थीक मदत जमा करावी] अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे याच्याकडे   संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे यांच्या नेत्रत्वात नुसकानग्रस्त शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: विदर्भातील बुलडाना वाशिम यवतमाळ. मराठवाडयातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापुर, शिरुर अनंतपाळ तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरड, तांदुळजा, वाडीवाघोली, टाकळी ब., जेवळी, काटगाव परीसरात  झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीठीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. विज पडुन अणेक ठीकानी  मनुष्य हानी झाले आहे. अनेक   जनावरे दगावली आहेत. ज्वारी, गहू, हरभरा हाता तोंडासी आलेल्या  पिकांची नासाडी झाली आहे.
 केळीच्या बागा आडव्या झाल्या तर अंबा, द्राक्षे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाचे आचारसंहितेचे कारण पुढे न करता पंचनाम्याचे वेळकाडु नाटक न करता. सबंधीत परिसरातील तलाठ्यांचे अहवाल मागवून घेत ताबडतोब अर्थीक मदत जाहीर करून शेतकरी बँक खात्यात जमा करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड आचारसंहिता संपल्यावर शासनास सळोकी पळो करण्यास भाग पाडून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसनार नाही याची नोंद आपण गंभीरपणे  घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देन्यात आला. निवेदनावर शेतकरी बाबुराव उफाडे, स्वागत सोट, सुभाषराव  देशमुख,  रफिक शेख, प्रतापराव उफाडे, अमिरोद्दीन शेख, हनुमंत उफाडे, मुस्तफा शेख, सोमनाथ बैकरे, प्रशांत उफाडे, टाकळी ब. प्रितम मोरे खोपेगाव, व्यंकटराव पाटील थेरगाव, अर्जुन मोरे गांजुर, नुराली शेख, रसुल शेख कारसा याच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR